Pune Crime : धारदार शस्त्राने दहशत माजवणाऱ्या आणि तरुणावर वार करणा-या सात जणांना अटक

एमपीसी न्यूज – हातात तलवार, कु-हाडी घेऊन दहशत माजवणा-या टोळक्याने आपल्याला पाहून पळाला का नाही म्हणून एका तरुणावर पाठलाग करून वार केले. खडकी बाजार परिसरात सोमवारी हि घटना घडली.

याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेतले आहे. शुभम आगलावे (वय 19), दीपक आगलावे (वय 18), अनिकेत चांदणे (वय 19), व्यंकटेश मुदलियार (वय 20), शरद तायडे (वय 20), कपिल भोसले (वय 19) व रोहित लांडगे (वय 20) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. याबाबत समीर अकबर पटेल (वय 20) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसोबत खडकी बाजार मधील दुर्गा वसाहत येथे सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गप्पा मारत बसले होते. यावेळी 8 ते 9 जणांचे टोळके हातात कोयते, कुऱ्हाडी, हॉकीस्टिक या सारखे घातक शस्त्र घेऊन परिसरात आले आणि अचानक गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळामुळे  नागरिकांची धावपळ झाली.

पण त्यावेळी फिर्यादी मात्र त्यांच्या मित्रांसोबत त्याच ठिकाणी उभा राहून या टोळक्याचा गोंधळ पाहत होते. याचा राग आरोपींना आला त्यांनी आम्हाला पाहून पळत नाही, असे म्हणत “पकडो इनको काट डालो” असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी हे तेथून पळून गेले. पण आरोपींनी त्यांचा पाठलाग केला आणि फिर्यादीवर जीवेघेणा हल्ला केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III