Pune Crime : बसायला खुर्ची दिली नाही म्हणून सात जणांनी केली दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज : बसायला खुर्ची दिली नाही, म्हणून सात जणांनी (Pune Crime) दोन जणांना मारहाण करून हॉटेलचेही नुकसान केले. तसेच, आम्ही इथले भाई आहोत म्हणत फेरीवाल्यांनाही त्रास दिला. लक्ष्मण बंगारी (वय 23, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. परंतु, सदर गुन्ह्यातील कोणालाही अद्याप अटक केलेली नाही. हि घटना 22 जून रोजी घडली.

Chikhali Robbery Case : चिखलीतून मोटरसायकलची चोरी, एकावर गुन्हा दाखल

22 जून रोजी फिर्यादी लक्ष्मण बंगारी हे आपल्या मित्रासोबत धानोरी येथे सम्राट स्वीटसमोर गोल बिल्डिंगजवळ एका हॉटेलमध्ये चहा पित बसले होते. यावेळी फिर्यादीच्या ओळखीचे इसम त्याच हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी आले. त्यांनी फिर्यादीकडे बसण्यासाठी खुर्ची मागितली. परंतु, त्यांनी ती देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. या रागातून सदर आरोपीने कोयता, पालघन, लाकडी बांबू सारखी हत्यारे तसेच मित्रांना सोबत आणले. ती हत्यारे हवेत भिरकावून ”आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादी लागू नका, नाहीतर एका एकाला संपवून टाकू” असे जोरजोरात ओरडून फुटपाथवर बसलेल्या लोकांना शिवीगाळ करून फिर्यादी व त्यांच्या मित्राला कोयत्याने व लाकडी बांबूने डावा अंगठा, उजव्या हाताच्या बोटावर, आणि पाठीवर वार केले. तसेच, फिर्यादी यांच्या मित्रास डोक्यात दगड मारून जखमी केले. तिथे असणाऱ्या दुचाकी फोडून हॉटेलचे व इतर दुकानांचे नुकसान करून दगड, बाटल्या मारून एकूण 20 हजार रुपयांचे नुकसान केले.

या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये 639/2022 कलम भा.द.वि. 326, 324, 323, 143, 146, 147, 149, 504, 506, 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हेगार एकूण सात असून त्यांची नावे ठाऊक नाही. या सातही जणांना अद्याप अटक करण्यात आली नसून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनावणे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.