Pune Crime : सात वर्षीय चिमुरडीचा 40 वर्षीय इसमाकडून विनयभंग

एमपीसी न्यूज – मैत्रिणीकडे खेळण्यासाठी निघालेल्या एका 7 वर्षीय चिमुरडीचा 40 वर्षीय विकृताने विनयभंग केला आहे. ही घटना नवी पेठेतील एका इमारतीच्या पार्कींगमध्ये घडली. याप्रकरणी नागरिकांनी विकृताला मारहाण केली.

महेश पंढरीनाथ शिंदे (रा. नवी पेठ)  असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.  याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 7 वर्षीय मुलगी मैत्रिणीकडे खेळण्यासाठी चालली होती. त्यावेळी विकृत महेशने तिला बोलावून घेतले. त्यानंतर त्याने चिमुरडीचा विनयभंग केला आहे. ही घटना इमारतीतील काही नागरिकांच्या निर्दशनास आली. त्यांनी महेशला मारहाण करुन जखमी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.