Pune Crime : धक्कादायक! आईनेच पोटच्या मुलीला फेकले कचऱ्यात

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील मंचर शहरातून एक (Pune Crime) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जन्म देताच सख्ख्या आईने पोटच्या मुलीला कचऱ्याच्या ढिगार्‍यावर फेकून दिले होते. मात्र पोलिसाच्या सतर्कतेने या चिमुरडीला जीवदान मिळाले आहे. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काहीच तासात या आईचा शोध घेऊन तिला बेड्या ठोकल्या आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मंचर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातील कचऱ्याच्या ढिगार्‍यात पिशवीत नुकतेच जन्मलेले अर्भक असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले होते. काही स्थानिक तरुणांनी पुढाकार घेऊन हे अर्भक घेतले आणि ग्रामीण रुग्णालय गाठले. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. मंचर पोलिसांनी ही तत्काळ शहरातील सर्व सीसीटीव्ही तपासले आणि या आधारे दोन महिलांना ताब्यात घेतले.

कसून चौकशी केल्यानंतर एका महिलेने हे अर्भक आपलेच (Pune Crime) असल्याची कबुली दिली. या महिलेला पहिल्या तीनही मुलीच आहेत. मात्र वंशाला दिवा हवा म्हणून या कुटुंबाने अजून एका आपत्याला जन्म दिला. परंतु पुन्हा मुलगी झाल्याने आईनेच या नवजात मुलीला कचराकुंडीत फेकून दिले होते. सुदैवाने या मुलीच्या रडण्याचा आवाज कानी पडल्याने तिला पुन्हा जीवदान मिळाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Tork Motors : द सपोर्टिअर क्रॅटॉस(R)X चे ऑटो एक्सपो २०२३ मध्ये पदार्पण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.