_MPC_DIR_MPU_III

Pune Crime : सोनसाखळी चोरटे सुसाट; एकाच दिवसात तीन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावले

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या एकट्यादुकट्या महिलांना टार्गेट करून हे सोनसाखळी चोरटे दागिने हिसकावताना दिसत आहेत. मंगळवारी एकाच दिवसात शहरात दोन सोनसाखळी चोरीच्या तर एक मोबाइल हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आली.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

पहिल्या गटात लोहगाव येथील एक महिला दूध घेऊन घराकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांना दगड मारून खाली पाडले आणि त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र या महिलेने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिक जमा झाले आणि चोरट्यांना पळ काढावा लागला.

दुसरी घटना शुक्रवार पेठेतील नातूबागकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. 52 वर्षाची महिला सायंकाळी शतपावली करून घरी परत जात असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून पळ काढला. तर तिसरी घटना डेक्कन जिमखाना परिसरात घडली. एक महाविद्यालयीन तरुण वॉकिंग करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.