Pune News : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – कात्रज डेअरीची फ्रॅन्चायजी घेण्यासाठी माहेरुन पैसे आण, अशी मागणी करुन त्यासाठी वारंवार होणाऱ्या मानसिक व शारीरिक जाचाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली आहे.

हि घटना जानेवारी 2019 ते ऑक्टोबर 2020 दरम्यान वारजे माळवाडी येथे घडली. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या मुलीच्या आईने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलीच्या पती व सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या मुलीचा जानेवारी 2019 मध्ये विवाह झाला होता. तिच्या पतीला कात्रज डेअरीची फ्रॅन्चायजी घ्यायची होती व त्यासाठी लागणारे पैसे मुलीने माहेरुन आणावे, अशी मागणी तिचा पती व सासू करत होते. त्यासाठी वारंवार होणाऱ्या मानसिक व शारीरिक जाचाला मुलीनं आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.