Pune Crime : सासरी होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – नवीन फ्लॅट विकत घेण्यासाठी माहेरून पैसे घेऊन यावेत, यासाठी सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून दिवाळीच्या दिवशी विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पुण्याच्या धनकवडी परिसरात ही घटना घडली. मयत विवाहितेच्या पतीसह पाच नातेवाईकांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भाग्यश्री निशिकांत निवगुणे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. मयत भजन विवाहितेचे वडील उत्तम धुमाळ यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2016 मध्ये भाग्यश्रीचे निशिकांत निवगुने याच्यासोबत लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून ते आतापर्यंत ती सासरी नांदत असताना पती आणि सासरच्या नातेवाईकांनी वेळोवेळी तिचा छळ केला. नवीन फ्लॅट विकत घेण्यासाठी तिने माहेरून पैसे आणावेत यासाठी तिचा वारंवार छळ करण्यात आला. टोचून बोलून तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. यासर्व छळाला कंटाळून भाग्यश्रीने 13 नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक घाडगे करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.