Pune Crime : गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात तडीपार गुन्हेगाराला अटक 

एमपीसी न्यूज – खुनाचा प्रयत्न, दुखापत यासारखे गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट-3 च्या पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. शनिवारी (दि.19) पद्मावती येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

ऋषीकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे (वय 20, रा. माने गिरणीच्या मागे, तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तडीपार गुन्हेगार ऋषीकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे याला पद्मावती पुणे येथे सार्वजनिक रोडवरुन ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरुद्ध सहकारनगर पोलिस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न, दुखापत यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्यास पुढील कारवाईसाठी सहकारनगर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी गुन्हे शाखा पुणे शहर अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे पुणे शहर बच्चन सिंग, सहा. पोलीस आयुक्त, प्रतिबंधक गुन्हे पुणे शहर डॉ.शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट -३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पो.ना.विल्सन डिसोझा, सहा. पोलीस उप निरीक्षक राहूल घाडगे, पो.हवा. मच्छिंद्र वाळके, पो.ना.सचिन गायकवाड यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.