Pune Crime : तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट तीन कडून अटक

एमपीसी न्यूज – खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत यासारखे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात तडीपार 
गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडून अटक करण्यात आले आहे. रविवारी (दि.20) हि कारवाई करण्यात आली. 
अभिजीत कांतीलाल पाटोळे (वय 22, रा. महात्मा फुले गंज पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या  तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत यासारखे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट तीन कडून सम्राट अशोक मित्र मंडळा समोर, महात्मा फुले गंज पेठ, पुणे येथील सार्वजनिक रोडवरुन ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर दत्तवाडी स्वारगेट पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याला पुढील कारवाईसाठी खडक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी गुन्हे शाखा, पुणे शहर अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे शहर बच्चन सिंग, डॉ. शिवाजी पवार सहा.पोलीस आयुक्त, प्रतिबंधक गुन्हे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-तीनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व स्टाफ दिपक मते, रोहीदास लवांडे,‌ विल्सन डिसोझा, सचिन गायकवाड यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.