Pune Crime : खून करून मृतदेह भरुन ठेवला पोत्यात…

एमपीसी न्यूज – भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवले ब्रिज येथे आज खून करून हात पाय बांधून पोत्यात भरलेल्या अवस्थेतील तरुणाचा मृतदेह सापडला आहे.

मयत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांकडून मिळेलेल्या माहितीनुसार, आज सकाळी नियंत्रण कक्षाला आलेल्या एका फोनद्वारे नवले ब्रिज जवळ एका पोत्यामध्ये मृतदेह असल्याची मिळाली होती. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या काही कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तेथील पाहणी केली असता त्यांना पोत्यामध्ये हात पाय बांधलेल्या अवस्थेत एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला.

अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत दोरीने हात-पाय बांधून त्याचा मृतदेह पोत्यात भरण्यात आलेला होता. भारती विद्यापीठ पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.