Pune Crime : सदाशिव पेठेतील एका घरात आढळला महिलेचा मृतदेह

एमपीसीन्यूज : पुण्याच्या मध्यवस्तीत असलेल्या सदाशिव पेठेतील एका घरात महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सडलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडल्याने ओळख पटली नाही. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

याप्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, सदाशिव पेठेत एका जुन्या घराच्या आतील काम सुरू आहे. त्यामुळे तेथे कोणी राहत नाही. दरम्यान आज सकाळच्या सुमारास या घरातून वास येत असल्यामुळे नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यावेळी कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. महिलेची ओळख पटवणे अडचणीचे ठरत आहे. पोलिसांनी जवळपासच्या परिसरात माहिती व चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.