Pune Crime : सात हजाराची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह दोघे ताब्यात

एमपीसी न्यूज – सात हजारांची लाच स्वीकारणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई वानवडी परिसरात झाली आहे.

आनंदा दत्तात्रय काजळे (वय 39) आणि गणेश राजेंद्र परीट (वय 33) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काजळे हे वानवडी विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरीस आहेत. तक्रारदाराने त्यांच्याकडे नोकरनामा मिळविण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी काजळेने तक्रारदार यांना हप्ता देण्याची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. यावेळी एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज वानवडीत 7 हजार रुपयांची लाच घेताना काजळे यांच्यासह परीटला रंगेहात पकडण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.