Pune Crime : चोरीच्या गाड्यावरून चेन चोरी करणा-या दोघांना अटक, 11 गुन्हे उघड

एमपीसी न्यूज – वेगवेगळ्या ठिकाणाहून गाड्या चोरून त्याद्वारे चेन चोरी करणाऱ्या दोघांना विश्रांतवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच चेन चोरी, सहा वाहन चोरी असे एकूण पंधरा गुन्हे उघड करण्यात आले असून एकूण सात लाख बारा हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रुपेश प्रकाश यादव (वय 36, रा. वडगावशेरी, पुणे) व हलीम तालीम शेख ( वय 40, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर, विश्रांतवाडी, विमानतळ व अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन चोरीच्या घटना वाढल्यामुळे कारवाईच्या संबंधी या भागातील सीसीटीव्ही फुटेज पाहताना सर्व ठिकाणच्या फुटेजमध्ये एकच इसम असल्याचे दिसून आले.

तो वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या वाहनाने चोरीचे हे गुन्हे करत असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी चंदननगर परिसरात दोन टीम तयार करून सापळा तयार करून त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

अकरा गुन्हे उघड एकूण सात लाखांचा मुद्देमाल जप्त

अटक आरोपीकडून पाच चेन चोरी व सहा वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून सात लाख बारा हजार 980 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.