Pune Crime : घरफोडी करणा-या दोन महिलांना अटक ; 52,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – येरवडा व कल्याणीनगर परिसरात घरफोडी करणा-या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 52 हजार 500 रुपये किंमतीचे केबल वायरचे बंडल, एअर कंडीशन कॉपर पाईप, प्लबींग मिक्सर आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राधा विशाल छत्तीसे (वय 28, रा. यशवंतनगर, येरवडा, पुणे), संगिता गोरख सोळसे ( वय 30, रा. यशवंतनगर, येरवडा, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपी महिलांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीचा गुन्हा यशवंतनगर भागात राहणा-या दोन महिला करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून 52 हजार 500 रुपये किंमतीचे केबल वायरचे बंडल, एअर कंडीशन कॉपर पाईप, प्लबींग मिक्सर आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.