Pune Crime : सिंहगड रोड परिसरात गांजा विक्री करणाऱ्या दोन सराईतांना अटक, आठ किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – सिंहगड रोड पोलिसांनी अवैधरीत्या गांजाची साठवणूक करून विक्री करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा आठ किलो 150 ग्रॅम गांजा जप्त केला.

सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव ब्रिज या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. अमोल मधुकर खैरे (वय 30) आणि श्रीकृष्ण सुभाष देवडे (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना त्यांना वडगाव ब्रिज याठिकाणी दोन इसम गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वडगाव ब्रिज या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्यांना भुताची वर बसलेले दोन इसम गांजाची विक्री करत असल्याचे दिसून आले त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे गांजा आढळला. पोलिसांनी हा सर्व गांजा जप्त केला असून आरोपींना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.