Pune Crime : दीपक मारटकर खून प्रकरणातील आणखी दोघे जेरबंद, आतापर्यंत नऊ जण अटकेत

एमपीसी न्यूज – पुण्यातील कसबा युवा सेनेचे विभाग प्रमुख दीपक मारटकर यांचा बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली गेली. ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी येथून आणखी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना काही आरोपी हे अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी या गावात लपले असल्याची माहिती मिळाली होती. तर पोलिसांच्या तपास पथकाने या गावी जाऊन संदीप उर्फ मुंगळ्या प्रकाश कोलते (वय 23) आणि लखन मनोहर ढावरे (वय 30) यांना अटक केली.

फरासखाना पोलिसांनी यापूर्वी अश्विनी सोपान कांबळे ( वय 25, बुधवार पेठ), महेंद्र मदनलाल सराफ (वय 57) आणि निरंजन सागर महंकाळे (वय 19) सनी कोलते, राहुल रागिर, रोहित क्षीरसागर आणि रोहित कांबळे यांना अटक केली आहे.

यातील आरोपी महेंद्र सराफ आणि अश्विनी कांबळे त्यांच्या सांगण्यावरून इतर आरोपींनी दीपक मारटकर यांचा खून केला. आरोपींनी दीपक मारटकर यांच्यावर तब्बल 48 वार केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.