Pune Crime – पुण्यात मध्यरात्री दुचाकींची तोडफोड, तीन संशयित ताब्यात

एमपीसी न्यूज – पुण्यातील येरवडा परिसरात रस्त्यावर पार्क केलेल्या सहा दुचाकींची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी सोमनाथ गायकवाड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार सोमनाथ गायकवाड हे लक्ष्मीनगर परिसरात वास्तव्यास आहेत. या परिसरात अनेक घरे असल्यामुळे रस्त्याच्या कडेला लोकांची वाहने पार्क केलेली असतात. गुरुवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या काही श्रोत्यांनी परिसरात दहशत माजवत पार्क केलेल्या दुचाकींची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यामध्ये काही दुचाकी पेटवून दिल्या तर काही दुचाकींचे जबर नुकसान झाले आहे.

नागरिकांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत संताप व्यक्त केला. येरवडा पोलिसांनी ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तीन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.