Pune Crime News : सारसबागेजवळ डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसीन्यूज : कचरा वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना सारसबागेजवळ घडली. त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने दुचाकीस्वार ठार झाला. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला.

घटनास्थळी स्वारगेट पोलीस आणि वाहतूक विभागाचे पोलीस दाखल झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव समजू शकलेले नाही.

_MPC_DIR_MPU_II

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोडने दुचाकी चालक सारसबागेच्या समोरून आण्णा भाऊ साठे चौकात जात होता. यावेळी पालिकेच्या कचरा वाहतूक करणारा डंपर पाठीमागून वेगात आला.

सारस बागेजवळ गेटसमोरच दुचाकीस्वाराला त्याने ठोकर दिली. डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची मिळताच स्वारगेट पोलीस व वाहतूक पोलिसांनी धाव घेतली आहे.

सहायक निरीक्षक अमोल रसाळ महिला सहायक निरीक्षक शेख अधिक माहिती घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.