Pune Crime : मैत्रिणीला मारल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलावर दोघांकडून अनैसर्गिक अत्याचार

एमपीसी न्यूज : गर्लफ्रेंडला मारल्याच्या संशयावरून (Pune Crime) अल्पवयीन मुलाने व त्याच्या साथीदारांनी एका 16 वर्षीय मुलाला दुचाकीवर बसवून जबरदस्तीने नेत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याला मारहाणही करण्यात आली असून, ही मुले पसार झाली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात 16 वर्षीय मुलाने तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी 16 आणि 19 वयोगटातील दोन मुलांसह त्यांच्या तीन साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हा प्रकार धुलीवंदनाची दिवशीच भरदुपारी मुंढवा चौकात एका पडीक जागेत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलाने यातील एका 16 वर्षाच्या मुलाच्या गर्लफ्रेंडला मारल्याचा संशय या आरोपींना होता. त्यामुळे त्यांनी या मुलाला रंग खेळत असतानाच दुपारी अडीचच्या सुमरास दुचाकीवर जबरदस्तीने बसवून मुंढवा चौक येथील एका पेट्रोल पंपाच्या पाठिमागील मोकळ्या जागेत नेले.

Pune BJP : कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजप ॲक्शन मोडवर; शहराध्यक्ष बदलण्याची चिन्हे

त्याठिकाणी नेल्यानंतर त्याला प्रथम हाताने मारहाण करण्यात आली. त्यानंतर (Pune Crime) त्याच्यावर यातील दोघा मुलांनी तिसऱ्याच्या सांगण्यावरून या मुलाशी अनैसर्गिक चाळे केले. त्यानंतर त्याला पोलिसांत तक्रार दिल्यास खल्लास करण्याची धमकी देऊन त्याला सोडून दिले. या पिडीत मुलाने कुटूंबाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.