Pune Crime : शिवीगाळ व आरडाओरडा करण्याचे कारण विचारणा-या दोघांवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – घरासमोर शिवीगाळ व आरडा ओरडा का करता असे विचारणा-या दोघांजणांवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी दोघांजणांना चतु:श्रृंगी पोलीसांनी अटक केली. बुधवारी (दि.4) रात्री सव्वा दहाच्या सुमारास पाषाण येथील सोमेश्वरवाडीत हि घटना घडली आहे.

गौरव संभाजी काकडे (वय 28, सोमेश्वरवाडी, पाषाण), शुभम संभाजी काकडे (वय 26, सोमेश्वरवाडी, पाषाण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी विक्रम राखपसरे ( वय 39, संध्यानगर, सोमेश्वरवाडी, पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राखपसरे हे बुधवारी (दि. 4) त्यांच्या भावासोबत घरासमोर उभे राहिले होते. त्यावेळी तिथे शिवीगाळ व आरडा ओरडा करत असलेल्या अटक आरोपीना तुम्ही शिवीगाळ व आरडा ओरडा का करत आहात, असा फिर्यादी यांनी जाब विचारला. चिडलेल्या आरोपीनी फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांना व त्यांच्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.