मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Pune Crime : प्रेयसीवर इम्प्रेस मारण्यासाठी तरुणाचे भलतेच धाडस; हातात पडल्या बेड्या

एमपीसी न्यूज : प्रेयसीवर इम्प्रेशन मारण्यासाठी (Pune Crime) आणि आईला गिफ्ट देण्यासाठी पुणे विद्यापीठातून कार चोरणाऱ्या समर्थ पोलिसांनी अटक केली. ओएलएक्सवर विक्रीसाठी असलेली कार विकत घेण्याच्या बहाण्याने त्याने ही कार पळवून नेली होती. इशांत शर्मा (वय 25) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत नवीद जैनुद्दीन शेख (वय 49, रा. नानापेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

Chattushringi : 16 वर्षीय विद्यार्थिनीला कामसूत्राचे फोटो दाखवले; शिक्षकाला बेड्या

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचा नानापेठेत जुन्या कार खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. 21 नोव्हेंबर रोजी दुपारी इशांत शर्मा नावाचा व्यक्ती कार खरेदीस आला. त्याने शेख यांना कार खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करून 2 लाख 90 हजारांचा धनादेश शेख यांना दिला. त्यानंतर शेख यांना विनवणी करून आरोपीने कार मम्मीला दाखवून आणतो सांगितले. त्यावर शेख यांनी त्याला होकार देऊन त्यांच्या भावाला आरोपीसोबत पाठवला. परंतु, आरोपीने त्याला विद्यापीठ गेट जवळ उतरवले. त्यालाही पाच मिनिटात येतो सांगून पोबारा केला.

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता आरोपी एके ठिकाणी कारसह सापडला. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने प्रेयसीवर इम्प्रेशन मारण्यासाठी आणि वाढदिवसानिमित्त आईला गिफ्ट देण्यासाठी कार चोरल्याची कबुली दिली.

Latest news
Related news