Pune Crime : अ‍ॅप डाऊनलोड करायाला लावून तरुणीची 1 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – जिओचे सीमकार्ड बंद होणार असल्याची भिती दाखवत तरुणीला अ‍ॅप डाऊनलोड करायला लावून 1 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात 27 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीला जून महिन्यात एका व्यक्तीचा फोन आला. तुमचे जिओचे सीमकार्ड बंद होणार आहे. ते सुरू ठेवण्यासाठी गुगल पेवरून क्युआर कोडच्या माध्यमातून एक रुपया पाठवा. त्यानंतर त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर क्युआर कोड सपोर्ट नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर त्याच्या माध्यमातून तरुणीच्या एचडीएफसी बँक खात्यामधून क्युआर कोडच्या माध्यमातून 99 हजार 969 रूपये ऑनलाईन काढून घेतले. अधिक तपास पोलीस निरीक्षक अमृत मराठे हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.