Pune Crime : सराईत चोरट्यास सापळा रचून अटक; अडीच लाखाचा ऐवज हस्तगत

एमपीसी न्यूज – कोंढवा पोलिसांनी सराईत गुन्हेगारास सापळा रचून जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून घरफोडीच सुमारे अडीच लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.  यामध्ये सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.

निजाम शेख ( 23 रा. अशोक नगर कोंढवा बुद्रुक) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस नाईक अमित साळुंखे व पोलीस अंमलदार ज्योतिबा पवार यांना शेख संदर्भात खबर मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस हवालदार रमेश गरुड, नवले, पोलीस नाईक निलेश वनवे, संजीव कळंबे, सुदाम वावरे, पोलीस अंमलदार किशोर वळे, आदर्श चव्हाण यांनी मिठानगर येथे शेखला ताब्यात घेतले.

त्याला पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने दोन घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून प्रत्येकी 1 लाख 7 हजार व 1 लाख 40 हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील , सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.