Pune : आवश्यक ‘मास्क’चा साठा केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; 4 लाखांचे मास्क जप्त

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्यात येणारे मास्क अधिक दराने विकण्याच्या उद्देशाने अधिक प्रमाणात साठा करून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा मास्कचा साठा लिंक एंटरप्रायजेस, ३५६ पवित्र इन्क्लेव्ह, लडकत पेट्रोल पंपासमोर, पहिल्या मजल्यावर, सोमवार पेठ, पुणे येथे करून ठेवला होता. याठिकाणी पोलिसांनी जाऊन ४,३०,४४५/- रु किंमतीचे वेगवेगळया प्रकारचे एकूण 17,805 तोंडाला लावण्याचे मास्क आज जप्त केले.

याप्रकरणी पोलीस उप निरीक्षक हनुमंत वामन शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मालक – भुपेश ओमप्रकाश गुप्ता (रा. पिंगळेवस्ती गंगा प सी/१,मुंढवा रोड, पुणे) आणि (कामगार) रोहन अजय शुक्ला (रा. पिंगळेवस्ती, मुंढवा रोड, सांडभोरवस्ती पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, यातील आरोपी भुपेश ओमप्रकाश गुप्ता याचे होम लिक एंटरप्रायजेस हे गोडावून आहे. रोहन अजय शुक्ला या तेथे कामगार आहे. दिनांक-२१/३/२०२० ते दिनांक- २६/०३/२०२० रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत होम लिंक एंटरप्रायजेस, ३५६ पवित्र इन्क्लेव्ह,. लडकत पेट्रोल पंपासमोर, पहिल्या मजल्यावर, सोमवार पेठ, पुणे या ठिकाणी होम लिक एंटरप्रायजेसचे मालक भुपेश ओमप्रकाश गुप्ता आणि कामगार रोहन अजय शुक्ला, (ऑफीसबॉय) यांनी कोरोना विषाणुंच्या बचावासाठी वापरण्यात येणारे पांढ-या रंगाचे गोल एन-९० मास्क, पिवळ्या रंगाचे आयएसआय मार्कचे व्हिनस व्ही – ४४ प्लस असें इंग्रजीत लिहीलेले एन-९५ मास्क व टू प्लाय (थ्री लेयर हॅडमेड व मशीन मेड) निळे, पांढरे व हिरव्या रंगाचे आयताकृती सर्जीकल मास्क एकुण किंमत ४,३०,४४५ रुपयाचे वेगवेगळे एकूण १७,८०५ नग, मास्क स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी, साठा केला.

तसेच शासनाने विहीत केलेल्या दरांपेक्षा जास्त रक्‍कम घेऊन विक्री केली. त्यामुळे त्यांचेविरुध्द आवश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३ सह ७ व भादंविक -३४ अन्चये कायदेशिर फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.