Pune : फसवणूक केल्याप्रकरणी स्मृती इराणी यांच्याविरुद्ध पुण्यात फौजदारी गुन्हा

एमपीसी न्यूज- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेल्या भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी 2014 व 2019 च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात शिक्षणाविषयी खोटी माहिती देऊन फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रुपाली पाटील यांनी हा खटला दाखल केला. 

इराणी यांनी 2004 साली कपिल सिब्बल यांच्याविरोधात दिल्लीतील चांदणी चौक मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रात बीए पर्यंतच शिक्षण झाल्याचं नमूद केले होते. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुक लढवत असताना त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात बीएच्या प्रथम वर्षापर्यन्त शिक्षण घेतल्याचे नमूद केले आहे.
  • रुपाली पाटील यांनी ऍड विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत हा खटला दाखल केला. हा खटला प्रथम न्यायदंडाधिकारी बी.एस गायकवाड यांच्या कोर्टात दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.