Pune : जळगावच्या सराईत गुन्हेगाराने पुण्यात एकाला घरात घुसून भोसकले

एमपीसी न्यूज – जळगाववरून आलेल्या एका सराईत गुन्हेगाराने पुण्यात एकाला घरात घुसून भोसकून ठार मारले. ही घटना आज, सोमवारी (दि. 17) खडकी येथे घडली. यामध्ये सराईत गुन्हेगार देखील जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बाळकृष्ण नरसू (रा. जळगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर तायडे असे गुन्हेगाराचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

मिळालेल्या माहितीनुसार, मयत बाळकृष्ण बोपोडी परिसरातील कुंदन कुशल या बहुमजली इमारतीमध्ये राहत होता. दुपारी तीनच्या सुमारास आरोपी तायडे हा बाळकृष्णच्या घरात शिरला. त्याने बाळकृष्ण याच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून शेजारी जमा झाले. त्यांनी बाळकृष्णच्या घराला बाहेरून कडी लावली आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा उघडल्यानंतर बाळकृष्ण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पोलिसांना दिसले. तसेच आरोपी नरसूदेखील जखमी झाला होता. पोलिसांनी नरसूला ताब्यात घेतले. त्याला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.