Pune Crime News : फरशीवर डोके आपटून सासूने केला सुनेचा खून; पुण्यातील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज- घरकाम व्यवस्थित करत नसल्याच्या  (Pune Crime News) आणि नातवाला योग्यरित्या सांभाळत नसल्याच्या कारणावरून सासूने सुनेचा फरशीवर डोके आपटून खून केला. पुण्यातील विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील लोहगाव परिसरात ही घटना घडली. विमानतळ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सासूला अटक केली आहे.

 

रितू रवींद्र माळवी (वय 28) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सासू कमला प्रभुलाल माळवी (वय 49) हिला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक समु चौधरी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सून घरात व्यवस्थित काम करत नाही, नातवाला व्यवस्थित सांभाळत नाही या कारणावरून सासू आणि सुनेत मागील काही दिवसांपासून वाद होते. याच कारणावरून सासू सुनेचा छळ करायची.

 

Pune News : सिहंगड रस्त्यावर फर्निचर गोडाउनला भीषण आग;  सुदैवाने जीवितहानी नाही

 

दरम्यान दोन दिवसांपूर्वी आरोपी सासू घरातील फ्रिजचा दरवाजा उघडत होती. यावेळी तिचा पाय चुकून सुनेला लागला. या कारणावरून दोघींमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर कमलाने रितूला मारहाण केली. तिचे डोके फरशीवर आपटले. या घटनेत रितुच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात रितुच्या डोक्याला दुखापत तसेच तिला मारहाण‌ झाल्याचे उघड झाले. सासू कमलाची चौकशी करण्यात आली. तेव्हा तिने सुनेला बेदम मारहाण करुन तिचा (Pune Crime News) खून केल्याची कबुली दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.