Pune : रात्रीच्या अंधारात जीपने चिरडले; एका चिमुकल्यासह 3 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : रात्रीच्या अंधारात (Pune) भरधाव पिकअप जीपने दोन दुचाकीसह 9 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. जुन्नर जवळील नगर-कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे हा अपघात घडला.

हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये एका चिमुकल्यासह 3 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सहा जण अद्याप गंभीर जखमी आहेत.

नगर-कल्याण महामार्गावर लवणवाडीत येथे हा भीषण अपघात घडला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या पिकप चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून दुचाकीसह तीन वाहनांना धडक दिली. यामध्ये एकूण आठ जण गंभीररित्या जखमी झाले होते.

जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर यातील एका चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर इतर सहा जणांची प्रकृती अद्याप गंभीर आहे.

 

PMC : पुण्यात 1,760 बेकायदेशीर मोबाईल टॉवर्स, करही बाकी; लवकरच होणार कारवाई

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.