Pune : गुरुवारी वीजग्राहक तक्रार निवारण दिन

एमपीसी न्यूज- पुणे परिमंडल अंतर्गत सर्व विभागीय कार्यालयांत गुरुवारी (दि. 6 जून) महावितरणच्या वतीने वीजग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

वीजग्राहकांच्या विविध तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येते. मात्र, या बुधवारी (दि. 5 जून) सार्वजनिक सुटी असल्यामुळे गुरुवारी ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. वीजग्राहकांच्या प्रामुख्याने वीजबील, नवीन कनेक्शन आदींसह वीजसेवेशी संबंधित विविध तक्रारी त्वरित निकाली काढण्यासाठी सर्व विभाग कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

रास्तापेठ, पद्मावती, नगररोड, पर्वती, बंडगार्डन, कोथरूड, पिंपरी, भोसरी, शिवाजीनगर तसेच मंचर, राजगुरुनगर आणि मुळशी या विभाग कार्यालयांमध्ये कार्यकारी अभियंता हे वीजग्राहकांनी दाखल केलेल्या तक्रारींवर सुनावणी घेतील आणि त्या निवारणासाठी तात्काळ कार्यवाही करणार आहेत. वीजग्राहकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like