Pune : दुबईहून आलेल्या प्रवाशाकडून विमानतळावर 11 लाखांचे सोने केले जप्त

एमपीसी न्यूज – पुणे आंतराराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून सीमा शुल्क विभागाच्या पथकाने 11 लाख 7 हजार रुपये किंमतीचे सोने आज गुरूवारी (दि.15) पहाटेच्या सुमारास जप्त केले आहे.

शेख तारीक महमुद असे सोने आणणा-या प्रवाशाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आंतराराष्ट्रीय विमानतळावर पहाटे दुबईहून स्पाईसजेटचे एसजी 52 विमान उतरले. या विमानाने आलेला प्रवाशाची सीमा शुल्क विभागाच्या पथकाने तपासणी केली असता त्याच्याजवळ सोने असल्याचे आढळले. त्याची झडती घेतल्यावर दोन सोन्याचे बिस्कीट चार भागात तुकडे करून जीन्स पॅन्टला कमरेला लावून आणलेले तर दोन सोन्याचे सिक्के हुबेहुब चलनी सिक्क्यांप्रमाणे बनवलेले त्याच्या पाकीटात मिळाले. तर र्‍होडीयम प्लेटींग केलेली एक सोन्याचीच किचेन रिंग असे त्याच्याकडून एकूण 11 लाख 7 हजार रुपये किंमतीचे 349. 93 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. सीमा
शुल्क विभागाने त्याच्याकडून ते सर्व सोने जप्त केले असून याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.