Pune : गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात 6 महिन्याच्या मुलीसह तिघेजण जखमी

एमपीसी न्यूज- घरगुती सिलेंडरमधून गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटामध्ये एका सहा महिन्याच्या मुलीसह तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना आज, सकाळी सव्वाआठच्या सुमारास संभाजीनगर खराडी येथे घडली. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरु असून सहा महिन्याच्या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. 

शंकर भवाळे (वय 28), आशाताई भवाळे (वय 22) व स्वराली भवाळे (वय 6) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरु असून तिघांपैकी सहा महिन्याच्या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे.

प्रभारी अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील संभाजीनगर परिसरात एका चाळीमध्ये बांधकाम मजूर भाड्याने राहतात. रविवारी रात्री भवाळे कुटुंबीय झोपेत असताना घरातील गॅस गळती होऊन संपूर्ण घरात गॅस पसरला होता. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आशाताई उठल्या आणि त्यांनी पाणी तापविण्यासाठी गॅस पेटवला असता मोठा स्फोट होऊन आग लागली. आज सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. स्फोटामुळे घरावरील पत्रे उडून गेले तर घराच्या भिंतीचे मोठे नुकसान झाले. घरातील सामान इतस्ततः पसरले गेले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.