Pune: मोदी सरकार 2.0 च्या वर्षपूर्तीनिमित्त सिलेंडर, सॅनिटायजर स्टँड, जीवनावश्यक किट वाटप

Pune: Cylinder, Sanitizer Stand, Essential Kit distributed on the occasion of Modi Government 2.0's first anniversary

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या पर्वातील प्रथम वर्षपूर्तीनिमित्त मोफत सिलेंडर, सॅनिटायजर स्टँड, जीवनावश्यक किट वाटप करण्यात आले.

महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ताताई टिळक, माधुरीताई मिसाळ व भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 10,001 व्या मोफत सिलेंडरचे वाटप, प्रभागातील हॉस्पिटल, डॉक्टर्स, विविध सोसायट्या, गर्दीच्या ठिकाणी 250  सॕनिटायझर स्टँडचे वाटप, आणि 500 नागरिकांना रेशनिंग किटचे वाटप महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धिरज घाटे, संघटनमंत्री रविजी अनासपुरे,संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक अजय खेडेकर, प्रभाग अध्यक्ष राजू काकडे, जयसिंग रजपूत, योगेश वेदपाठक, पर्वती प्रभाग अध्यक्ष मुकेश पायगुडे, राहुल कोसंदर, अण्णा ओतूरकर, नंदू झेंडे, आझाद शेख, नंदू पवार, राजू थोरात, राजेंद्र तांबे, बाळासाहेब उभे, संजय गायकवाड, निलेश जाधव,प्रदीप गायकवाड, शुभम शिंदे,  सोसायट्यांनाचे चेअरमन, सेक्रेटरी, व्यापारी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

अजय खेडेकर नेहमीच समाज उपयोगी कार्यक्रम राबवित असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. तर, महापालिकेच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या कामाचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.