Pune : आंब्यांच्या कोंदणात सजले दगडूशेठ गणपती बाप्पा

अक्षयतृतीयेनिमित्त 'दगडूशेठ' चा आंबा महोत्सव

एमपीसी न्यूज- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आज मंगळवारी गणपती बाप्पांना तब्बल 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. सकाळी 8 वाजल्यापासून दिवसभर मंदिरात ‘आंबा महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे.

पुण्यातील आंब्यांचे व्यापारी देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य अर्पण करण्यात आला. तत्पूर्वी पहाटे 4 ते सकाळी 6 पर्यंत प्रख्यात गायक अजित कडकडे यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. त्यानंतर सकाळी 8 वाजता विशेष गणेशयाग करण्यात आला. रात्री 9 वाजता अखिल भारतीय महिला वारकरी भजनी मंडळाच्यावतीने उटीचे भजन होणार आहे. आंब्याचा प्रसाद दुस-या दिवशी म्हणजेच बुधवारी ससूनमधील रुग्णांना व गणेशभक्तांना देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.