Pune News : गणेश जन्म सोहळ्यानिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात आकर्षक आरास, भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने वतीने गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थीला मंदिरात (Pune News) आयोजित करण्यात आला आहे.मंदिर पहाटे 3 पासून दर्शनासाठी खुले करण्यात आले असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यंदा 228 तोळे सोन्याच्या पाळण्यात जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

Pune Breaking News : दौंड मृतदेह प्रकरणी नवा खुलासा; आत्महत्या नाही हत्याच!

गणेश जन्म सोहळ्यानिमित्ताने आज पहाटे 4 ते सकाळी 6 यावेळेत पद्मश्री उस्मान खान यांनी सतारवादनातून श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केला. (Pune News) त्यापूर्वी पहाटे 3 वाजता मंदिरात ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक देखील झाला. मंदिरावर तिरंगी फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. परदेशी महिलांनी देखील बाप्पाच्या दर्शनासाठी दगडूशेठ मंदिरात हजेरी लावली.गर्दी संपेपर्यंत वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन शहर पोलीस वाहतूक शाखेतर्फ करण्यात आला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.