Pune dam water: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतून विसर्ग

एमपीसी न्यूज: पुणे व आसपासच्या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाला आहे. (Pune dam water)त्यामुळे सध्या पुणे शहराला पाणीपुरवठा करत असलेल्या धरणातून विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. पुण्यातील मुळशी,खडकवासला आणि पानशेत धरणातून विसर्ग करण्यात येणार असून धरण परिसराच्या आसपास रहात असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

 

मुळशी धरण जलाशय पातळी आज स. 7 वाजता 607.70 मी. वर पोहोचली असून संबंधीत जलाशय साठा 506.52 द.ल.घ.मी आहे. धरण जलाशय 88.74 टक्के क्षमतेने भरले आहे. धरण पाणलोट परिसरात मोठ्या प्रमाणात पर्ज्यन्यमान होत असून गेल्या 24 तासांत दावडी पर्ज्यन्यमापक केंद्रात 304 मीमी पावसाची नोंद झालेली आहे; तसेच गेल्या 24 तासांत एकूण 49.49 द.ल.घ.मी आवकाची नोंद झालेली आहे. बसवराज मुन्नोळी, टाटा पॉवर यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज, सद्यस्थितीतील पर्ज्यन्याचा कल इ. पाहता पुढ़ील काही काळात आवश्यकतेनुसार धरणाच्या सांडव्यावरून नियंत्रित विसर्ग सोडण्यात येणार आहे.मुळशी धरण हे मुळा नदीवरती बांधण्यात आले आहे.

Bhama Dam: भामा आसखेड धरणातून 2 हजार 435 क्युसेक विसर्ग सुरू

खडकवासला धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे.(Pune dam water) पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज दुपारी 12 दरम्यान खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये साधारण 3 हजार 424 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. मुठा नदी पात्रामध्ये दुपारी 12 वाजता साधारण 1712 क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार होता मात्र तो वाढवून 3 हजार 424 क्युसेक करण्यात आला असं यो.स.भंडलकर, सहाय्यक अभियंता, श्रेणी 1 खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी सांगितले आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. खडकवासला धरण हे मुठा नदीवर बांधण्यात आले आहे

 

पानशेत धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 100 टक्के भरले असल्याने पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग सकाळी 9.30 वाजता 12 हजार 936 क्यूसेक्स करण्यात आला. तो विसर्ग सकाळी वा. 10.15 वाजता 18 हजार 784 क्यूसेक्स करण्यात आला आहे.असे यो.स.भंडलकर, सहाय्यक अभियंता, श्रेणी 1 खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी सांगितले आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. (Pune dam water) पानशेत धरण हे आंबी नदीवर बांधण्यात आले आहे.आंबी नदी ही मुठा नदीची उपनदी आहे.या सर्वच धरणातून विसर्ग सुरू करण्यात येत असल्याने येथील नागरिकांनी प्रशासनाने नदीपात्रात उतरू नये आणि योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.