Pune : ‘दर्याभवानी’ नाटकाद्वारे रोमांचक सागरी युध्दाचा थरार शनिवारी पुण्यात

एमपीसी न्यूज- इंग्रजांना हवे असलेले खांदेरी बेट श्रीशिवछत्रपतींच्या आरमाराने समुद्रातील ज्या युध्दात ताब्यात ठेवले, त्या १६८० मधील युद्धाचा ऐतिहासिक थरार ‘दर्याभवानी ‘ या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर आला असून २४ ऑगस्ट रोजी पुण्यात प्रयोग होणार आहे. अशी माहिती निर्माते कालिका विचारे, संदीप विचारे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

मुंबई आणि अलिबागच्यामध्ये खांदेरी बेट (जलदुर्ग) लागते. इ स 1680 मध्ये श्रीशिवछत्रपतींच्या मावळ्यांनी हे बेट इंग्रजांकडून सागरी युद्धात जिंकून घेतले. इंग्रज विरुद्ध मराठे या सागरी युद्धाचा थरार म्हणजे दर्याभवानी हे नाटक आहे. यात चाळीस कलाकारांच्या संचात नृत्य, नाट्य आणि मराठी रंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रत्यक्ष दोन जहाजांमधील इंग्रज आणि मराठे यांचे युद्ध रंगमंचावर होणार आहे

उर्वीजा थिएटर (मुंबई) निर्मित ‘ दर्याभवानी ‘ हे ऐतिहासिक नाटक रसिकांना पुण्यात प्रथमच पाहायला मिळणार आहे. 40 जणांच्या संचातील भव्य नाट्य प्रयोग 24 ऑगस्ट रात्रौ 9 वा बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे होणार आहे.

या महानाटयाचे लेखन आणि गीत लेखन संदीप विचारे यांनी केले आहे. दिग्दर्शन डॉ. अनिल बांदिवडेकर यांचे आहे. नेपथ्य प्रसाद वालावलकर, संगीत मनोहर गोलांबरे यांचे आहे. नृत्य रचना सचिन गजमल यांच्या आहेत. वेशभुषेची जबाबदारी मोहिनी टिल्लू, कलिका विचारे, गणेश मांडवे यांनी सांभाळली आहे. यातील गाणी आदर्श शिंदे (गोंधळ) नंदेश उमप (पोवाडा) प्रा.गणेश चंदनशिवे (वासुदेव गीत) यांनी गायली आहेत. प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे .

या युद्धात इंग्रजांना मदत करण्या करता जंजिऱ्याचा सिद्धी पण येतो या दोघांच्या म्हणजे सिद्दी आणि इंग्रज यांच्या आरमराला थळच्या समुद्रात मायनाक भंडारी आणि दौलतखांच्या नेतृत्वाखाली मराठे पाणी पाजतात आणि विजयश्री खेचून आणतात.. हा सर्व थरार ‘दर्या भवानी ‘ द्वारे रंगमंचावर पाहायला मिळणार आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.