Pune : दत्तात्रेय काजळे यांचे उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच !

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषदेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय पुताजी काजळे यांनी केला आहे. कोहिनकर यांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी करीत काजळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात काजळे यांनी म्हटले आहे की, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी वरिष्ठांची परवानगी न घेता अनेक बेकायदेशीर निर्णय घेतले आहेत. कोहिनकरांच्या नियंत्रणामध्ये खूप मोठे रॅकेट जिल्हा परिषद पुणे येथे कार्यरत आहे. कोहिनकरांच्या आशीर्वादाने जिल्ह्यातील13 पंचायत समित्या व जिल्हा परिषद पुणे येथे खूप मोठा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. या संदर्भातील सर्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावा काजळे यांनी केला आहे

कोहिनकर यांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी या मागणीसाठी काजळे यांनी मागील चार दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. मात्र अद्याप प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दाखल घेतली नाही असे काजळे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.