Pune : मुळा नदीपात्रात 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला

एमपीसी न्यूज- मुळा नदीपात्रात संगमवाडी जवळ आज, शुक्रवारी सकाळी एका लहान मुलाचा मृतदेह आढळून आला. अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

अंदाजे 12 वर्षे वयाचा मुलगा असून अंगात काळया व लाल रंगाचे पट्ट्याचे फुल भाह्याचे टी शर्ट व काळया रंगाची फुलं पँट घातलेली आहे. या वर्णनाचा मुलगा हरवला असल्यास येरवडा पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. येरवडा पोलीस तपस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.