Pune: समोश्याच्या चटणीमध्ये सापडला मेलेला उंदीर

एमपीसी न्यूज – समोश्याच्या गोड चटणीमध्ये मेलेला उंदीर आढळून आल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात उघडकीस आला. कलमा नेहरु हॉस्पिटलजवळ असणाऱ्या शारदा स्वीट सेंटरमध्ये हा प्रकार गणेश चतुर्थीच्या दिवशी उघडकीस आला आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी एका ग्राहकाला देण्यात आलेल्या समोश्याच्या चटणीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ग्राहकाने शारदा स्वीट सेंटरमधून 200 समोसे खरेदी करून नेले होते . समोश्यांसोबत दिलेल्या गोड चटणीमध्ये मेलेला उंदीर सापडला. सर्व स्तरातून या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

या प्रकारची माहिती मिळताच अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शारदा स्वीट सेंटरमधील वेगवेगळ्या पदार्थांचे नुमने तपासणीसाठी जमा केले असून ते चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत शारदा स्वीट्स हे दुकान बंद ठेवण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like