Pune : सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथे आढळला तरुणीचा मृतदेह

एमपीसी न्यूज- सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथे एक तरुणी मृतावस्थेत आढळुन आल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (दि.2) दुपारी दोन ते तीनच्या सुमारास उघडकीस आली.

तेजसा श्यामराव पायाळ (वय.26 वर्षे रा. फ्लॅट न.15) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी मुळची पंचशील नगर, पालवन रोड, बीड येथील असून तिचे एम बी ए पर्यंत शिक्षण झाले आहे. नोकरीच्या शोधासाठी पुण्यात माणिकबाग येथे भाड्याने फ्लॅट घेऊन आई व दोन बहिणी समवेत ती राहत होती. काही दिवसांपूर्वी हे सर्वजण बीड येथे गेले होते. मात्र तीन दिवसांपूर्वी ही तरुणी एकटीच परत पुण्याला आली होती.

सिहंगडरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.