Pune : मिळकत कर सवलतीची मुदत ३० जुनपर्यंत : हेमंत रासने

Deadline for income tax relief till June 30: Hemant Rasane

जुलै महिन्यात शास्तीकर न आकारण्याचा निर्णय

एमपीसी न्यूज – मिळकत करात देण्यात येणारी पाच ते दहा टक्के सवलतीची मुदत ३० जुनपर्यंत वाढविण्यात आली आहे. स्थायी समितीने मंगळवारी या विषयाला मंजुरी दिली. तसेच, जुलै महिन्यात शास्तीकर देखील न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही निर्णयामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

आर्थिक वर्षाच्या पहील्या तिमाहीतील अखेरच्या दिवसापर्यंत म्हणजेच ३१ मेपर्यंत मिळकत कर जमा करणाऱ्यांना करात पाच ते दहा टक्के सवलत दिली जाते. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात कोरोनामुळे लाॅकडाऊन हाेता. या कालावधीत नागरीकांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत सुमारे तीनशे काेटी रुपये मिळकत कर जमा केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

ऑनलाईन रक्कम भरण्यासही बहुतेक नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या लाॅकडाऊनच्या कालावधीत मुदतीत मिळकत कर जमा न करू शकलेल्यांना ३० जुनपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जात हाेती. महापाैर मुरलीधर माेहाेळ यांनी याबाबत प्रशासनाला सुचना केल्या हाेत्या.

या मागणीला महापािलका आयुक्त शेखर गायकवाड आणि मिळकत कर विभाग प्रमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमाेर ठेवला हाेता. त्याला आज मंजुरी देण्यात आली, असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

तर, कोरोनाच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या स्थितीत मोठ्या प्रमाणात करदात्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे मिळकतकरावरील शास्तीकर या वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत आकारण्यात येऊ नये, अशी मागणी शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.