Pune: कात्रजच्या प्राणी संग्रहालयातील ‘नंदिनी’ वाघिणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यातील कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात पर्यटकांचे आकर्षण असलेल्या ‘नंदिनी’ या वाघिणीचा आज (गुरुवारी) सकाळी अल्पशा आजारपणानंतर मृत्यू झाला.

पुण्यातील पेशवे पार्कमध्ये 16 वर्षांपूर्वी जन्मलेल्या तीन बछड्यांपैकी ही एक वाघीण होती. त्यानंतर ती राजीव गांधी प्राणी संग्रहालयात होती. मागील 15 दिवसांपासून ती आजारी होती. त्यामुळे तिला सलाईनवर ठेवण्यात आले होते. आज सकाळी अखेर तिची प्राणज्योत मालवली.

प्राणी संग्रहालय प्रशासनाने तिला वाचविण्यासाठी  शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्याला यश आले नाही. अखेर नंदिनीने जगाचा निरोप घेतला.

पुण्याच्या पेशवे पार्कमध्ये 16 वर्षांपूर्वी पेशवे पार्कमध्ये तीन बछडे जन्मले होते. त्यात दोन मादी आणि एक नर होते. नंदिनी, दामिनी आणि तान्हाजी असे त्यांचे  नामकरण करण्यात आले होते. नंदिनी आणि तान्हाजी राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात होते तर दामिनीला राजस्थानच्या एका प्राणी संग्रहालयाला देण्यात आले होते. तिचाही मागील वर्षी मुत्यू झाला.

राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील तिन्ही बछडे पर्यटकांचे मोठे आकर्षण होते. त्यांना पाहण्यासाठी प्राणी संग्रहालयात मोठी गर्दी व्हायची.

दरम्यान मागील 15 दिवसांपासून नंदिनीने खाणेपिणे सोडले होते. त्यामुळे तिला सलाईनवर ठेवले होते. आज सकाळी अखेर तिचे प्राणोत्क्रमण झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.