Pune : वॉशिंग सेंटरमध्ये शॉक लागून तरुणाचा दूर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज – विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दूर्दैवी घटना सोमवारी (दि.17) दूपारी दीडच्या सुमारास मुंढवा येथील मिरॅकल वॉशिंग सेंटर येथे घडली.

मनोज ऊर्फ अरविंद लक्ष्मण जाधव (वय  ३५) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याप्रकरणी वैशाली जाधव (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी वैशाली यांचे पती मनोज हे मुंढवा येथील मिरॅकल वॉशिंग सेंटर येथे काम करत होते. दरम्यान  वॉशिंग सेंटरचे मालक आणि कामगारांनी तेथील उपकरणांची योग्यरित्या देखभाल न केल्यामुळे त्यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे  विजेचा शॉक लागून मनोज यांचा त्यात दूर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.