Pune : दत्तवाडी भागात पावसामुळे भिंत कोसळल्याने महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यात दत्तवाडीमधील निर्मल मित्रमंडळाजवळ पावसामुळे भिंत कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे.  

संगीता नितीन रणदिवे (वय ३५, रा. जनता वसाहत) असे मृत महिलेचे नाव आहे.

  • याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आज सायंकाळी पुण्याच्या अनेक भागात पाऊस झाला. सायंकाळच्या सुमारास पाऊस झाल्याने पुण्यात दत्तवाडी भागात भिंत कोसळून महिला गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही पावसाळ्यातील पहिली घटना घडली आहे.

संगीता नितीन रणदिवे असे महिलेचे नाव असून ती कचरा वाचण्याचं काम करते. भिंत कोसळल्याने संगीता जखमी झाली होती. तिला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.