Pune : इंजेक्‍शन दिल्यानंतर झालेल्या ड्रग्ज रिऍक्‍शननंतर तरुणाचा मृत्यू ; डॉक्टर विरोधात गुन्हा 

एमपीसी न्यूज- इंजेक्‍शन दिल्यानंतर झालेल्या ड्रग्ज रिऍक्‍शननंतर एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. खडकीतील जोशी रुग्णालयात ही घटना घडली. आशिष राहुल अल्हाट (वय 25, रा. रेंजहिल्स, खडकी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जोशी रुग्णालयातील एका महिला डॉक्‍टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला 5 ऑक्‍टोबर 2018 आशिष आल्हाट याला जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे एका महिला डॉक्‍टरने त्याला इंजेक्‍शन दिल्यावर ड्रग्ज रिऍक्‍शन झाली. मात्र यावर तातडीने कोणतीही उपाययोजना किंवा औषधोपचार करण्यात आले नाहीत. यामुळे आशिषचा मृत्यू झाला.
आशिष याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित महिला डॉक्‍टरविरुध्द खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कांबळे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.