Pune : SRA वरून अरविंद शिंदे आणि दिलीप बराटे यांच्यात वादावादी

एमपीसी न्यूज – SRA इमारतीच्या वाढीव उंचीबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी मत व्यक्त केले होते. त्यावर काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी आहे त्या SRA च्या इमारतीची कामे पूर्ण होत नसल्याबाबत सभागृहात मुद्दा उपस्थित केला. त्याला माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे आम्ही मतही व्यक्त करायचे नाही का?, त्यामुळे मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत काँगेस – विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला. त्यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हस्तक्षेप करून ज्या विषयाचे आपल्याला नियम करण्याचे अधिकारच नाही, त्यावर चर्चा कशाला?, असे बोलून या वादावर पडदा टाकला. शिंदे व बराटे यांना शांत करून पुढील महापालिकेच्या कामकाजाला सुरुवात झाली.

अनेक ठेकेदार किचकट नियमावलीमुळे काम सोडून जातात. माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले बांधकाम व्यावसायिक असल्याने त्यांना याचा जास्त अनुभव असल्याचे स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप म्हणाले. तर, तुम्ही सभागृहात बोलायला उभे राहिले असता, तुमच्या बोलण्याला काहीही किंमत कोणीही देत नाही, अशी टीका भिमाले यांनी जगताप यांच्यावर केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.