Pune : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्जमेळा उत्साहात; बँक ऑफ महाराष्ट्र मदतीचा लाभ घेण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आव्हानांच्या युगात माणसाला आपल्या गरजा पूर्ण करणे अवघड झाले आहे. त्यांना बँक ऑफ महाराष्ट्र मदतीचा आणि सहकार्याचा लाभ देऊ इच्छिते, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपमहाप्रबंधक एच. ए. माजिरे यांनी केले. एस .एम. जोशी महाविद्यालयात आयोजित कर्ज मेळाव्यात ते बोलत होते.

उपमहाप्रबंधक एच. ए. माजिरे म्हणाले, वाहन कर्ज, घर कर्ज व शैक्षणिक कर्ज सुलभ हप्त्यात दिले जाईल. त्यावेळी मारुती हुंडाई या कंपन्या आणि बांधकाम कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले होते .शैक्षणिक संस्था या समाजोपयोगी कार्याची केंद्रे बनल्या पाहिजेत असा त्यांनी व्यक्त केला. पैशाअभावी ज्यांचे शिक्षण अपुरी राहते त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सहाय्यक महाप्रबंधक संजीव कलवले आणि सहाय्यक महाप्रबंधक रश्मी रेखापती यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गजानन वाघ यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉक्टर संजय जगताप यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. शरद पासले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like