Pune : एनआरसी, सीएबी आणि एनपीआर विरोधातील स्वाक्षरी मोहिमेस डेक्कन पोलिसांनी परवानगी नाकारली

एमपीसी न्यूज – फर्ग्युसन महाविद्यालयात एनआरसी, सीएबी आणि एनपीआर विरोधात राबविण्यात येणाऱ्या स्वाक्षरी मोहिमेस डेक्कन पोलीस ठाण्याने परवानगी नाकारली आहे. तसेच याबाबतची नोटीस दोन विद्यार्थ्यांनाही पाठविली आहे. हि स्वाक्षरी मोहिम फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मेन गेटवर आज सकाळी १० वाजता राबविण्यात येणार होती.

दर्पण सुभाषराव शिंदे आणि संतोष मधुकर रासवे या दोन विद्यार्थ्यांना पोलिसांनी नोटीस पाठविली आहे.

तसेत पोलिसांनी नोटीसमध्ये म्हटले आहे कि, शासनाने नुकतेच लागू केलेले एनआरसी, सीएबी आणि एनपीआर विरोधात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मेन गेटवर आज सकाळी 10 वाजता राबविण्यात येणार होती. मात्र, यास डेक्कन पोलीस ठाण्याने परवानगी नाकारली आहे. याबाबत दोन दोन विद्यार्थ्यांना पोलिसांनी नोटीस पाठविली आहे. तसेच जर याविरोधात आंदोलन करून कायदा सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.