Pune: आमदार चेतन तुपे यांच्यावतीने सहा व्हेंटिलेटरचे लोकार्पण

Pune: Dedication of six ventilators on behalf of MLA Chetan Tupe कोविड 19 तपासणी सेंटर महापालिकेने वाढविले आहेत, तीव्रता कमी असली तरी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कोरोना संसर्गामुळे उदभवलेल्या महामारीच्या संकटाचा मुकाबला करत आहे. सामाजिक भान व काळाची गरज लक्षात घेऊन आमदार चेतन तुपे यांच्या पुढाकारातून 45 लाख रुपयांचे 6 व्हेंटिलेटरचे लोकार्पण करण्यात आले.

कोविड 19 या महामारीमुळे अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा जसे बेड्स, व्हेंटिलेटर कमी पडत आहे. या आजारात श्वसनाचा त्रास होत असल्याने व्हेंटिलेटर्सची गरज मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

व्हेंटिलेटर्सचा लोकार्पण सोहळा साध्या पध्द्तीने नोबल हॉस्पिटल व सना हॉस्पिटल, कोंढवा येथे करण्यात आला. मगरपट्टा सिटी आणि अमानोरा टाऊनशिप तसेच तुपे परिवार यांच्या सहकार्यातून व्हेंटिलेटर खरेदी केले आहेत.

कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी या व्हेंटिलेटर्सची अतिशय आवश्यकता आहे. आणि या आवश्यकतेच्या काळात असा अनोखा, लोकहिताचा उपक्रम चेतन तुपे यांनी हाती घेऊन अशा भीषण प्रसंगी रुग्णांना दिलासा दिला आहे, असे मत यावेळी नोबल हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. एच.के.साळे यांनी व्यक्त केले.

कोविड 19 तपासणी सेंटर महापालिकेने वाढविले आहेत, तीव्रता कमी असली तरी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पुणे शहर व उपनगरात व्हेंटिलेटर अपुरे पडत आहेत. व्हेंटिलेटर अभावी कोणाच्या जीविताला धोका होऊ नये या हेतूने हडपसर विधानसभा मतदारसंघात सहा व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले आहेत.

याप्रसंगी आमदार चेतन तुपे, मगरपट्टा सिटीचे सतीश मगर, अमनोराचे अनिरुद्ध देशपांडे, डॉ. दिलीप माने, डॉ. एच.के.साळे, डॉ. मंगेश लिंगायत, डॉ. सिद्धराम राऊत, प्रभाग समिती अध्यक्षा पुजा कोद्रे, माजी महापौर वैशाली सुनील बनकर, नगरसेवक आनंद अलकुंटे, अशोक कांबळे, योगेश ससाणे, हेमलता मगर, नारायण लोणकर, अनिसभाई सुंडके, नगरसेविका नंदा लोणकर, रईस सुंडके, स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे, संजीवनी जाधव, अमोल हरपळे, विजय तुपे, डॉ. शंतनु जगदाळे सागर भोसले, राकेश कामठे, संजय लोणकर, समीर पठाण, बापू मुलाणी, मैमुद्दीन शेख, राहुल लोणकर, राजू अडागळे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.