Pune : आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेले नगरसेवक दीपक मानकर ससून रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज- जगताप आत्महत्या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या छातीमध्ये दुखू लागल्याने त्यांना गुरुवारी रात्री उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. विशेष न्यायाधीश ए.एस.महात्मे यांनी त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. काल गुरुवारी त्यांच्या छातीमध्ये अचानक दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर दीपक मानकर फरार झाले होते. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्यांनी पुणे सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु या तीनही न्यायालयांनी अटकपूर्व जामीन फेटाळले आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दहा दिवसात पोलिसांपुढे शरण जाण्यास सांगितले. त्यानुसार मानकर आज (1 ऑगस्ट) सकाळी पोलिसांमध्ये हजर झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.